जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव जिल्ह्यात एका ३० वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुकनाईक तांडा परिसरात एका ३० वर्षीय विवाहित महिलेवर कथित सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना (१७ जुलै) समोर आली आहे. या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : तक्रारीनुसार, पीडितेला जेवणातून गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. त्यानंतर तिला उसाच्या फडात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढ्यावरच न थांबता, या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वारंवार धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ४ नामनिर्देशित आणि दोन अनोळखी आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()
