चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.
अडावद (ता. चोपडा): सिंगमच्या स्टाइलमध्ये खऱ्या अर्थाने कायद्याचा बाऊन्सर बनलेल्या अडावद पोलीसांनी अवैध गावठी दारू भट्टी चालवणाऱ्या गुन्हेगाराला चांगलाच धडा शिकवला आहे!

पांढरी शिवारातील नाल्याच्या काठी चोरट्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध हातभट्टीच्या अड्ड्यावर अडावद पोलिसांनी बॉम्बस्फोटक धडक कारवाई केली. गोपनीय माहितीवरून झालेल्या या छाप्यात एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला.

सिंगम स्टाइल अॅक्शन:
सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या पथकाने सिंघम सारखी धडाकेबाज छापा टाकला. पथकातील जवान – पोहेकॉ/१०९ किरण रमेश शिरसाठ, परी.पोउपनि सचिन नागरे, सफौ/२५७० जितेंद्र सोनवणे, पोहेकॉ/१५९० शेषराव तोरे, पोहेकॉ/२५३ भरत नाईक, पोकॉ/११०३ भूषण राजेंद्र चव्हाण आणि पोकॉ/२००४ प्रदिप पाटील – यांनी रणकंदनात उतरून अवैध भट्टीचा पूर्णपणे विध्वंस केला.

आरोपी: कैलास काशिनाथ कोळी (वय ३३ वर्षे, रा. इंदिरा नगर प्लॉट भाग, अडावद) याच्या घरगुती अड्ड्यावर ही अवैध भट्टी चालत होती. त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त केलेला मुद्देमाल (जागेवरच नष्ट):- २,००० लिटर गूळ-नवसागर मिश्रित कच्चे/पक्के रसायन – १२ प्लास्टिक ड्रम्स (किंमत ₹१,४४,०००)
– लोखंडी पत्र्याची टाकी, लाकडी चूल व भट्टीचे साहित्य (₹३,०००)
– ४० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू (₹४,०००)
एकूण किंमत: ₹१,५१,००० – सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार किरण शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(फ), (ब), (क), (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलीस प्रशासनाचा इशारा:
“अवैध धंदे चालवणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला सिंगम स्टाइल भेट मिळेल! कायद्याची सरबराई कोणालाही सहन केली जाणार नाही!”.
