चोपडा प्रतिनिधी, यद्नेश्वर पाटील.

“प्रथम कर्तव्य, मग आवाहन!”

नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी स्वतःचा SIR फॉर्म भरला

लोकशाही प्रक्रियेला अधिक मजबूत आणि पारदर्शक करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी स्वतःचा ‘SIR फॉर्म’ भरून पूर्ण केला आहे.

नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील यांनी म्हटले आहे,  

“शहराची प्रथम नागरिक म्हणून माझी स्वतःची माहिती अद्ययावत करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. याच जबाबदारीतून मी आज SIR फॉर्म भरला. मी माझ्या सर्व चोपडाकरांना नम्र आवाहन करते की, लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभागी व्हा. आपला मतदार हक्क अबाधित ठेवण्यासाठी आजच आपल्या प्रभागातील *BLO (मतदान केंद्र स्तरीय अधिकारी)* यांच्याशी संपर्क साधा आणि आपला SIR फॉर्म भरून मतदार यादीतील माहिती अद्ययावत करा.”

“चला, एक जबाबदार नागरिक बनूया!” असा संदेश देत नगराध्यक्षा यांनी चोपडातील नागरिकांना मतदार यादी अद्ययावतीकरणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे.

कृतीसाठी स्मरणिका

– आपल्या भागातील BLO यांच्याशी त्वरित संपर्क साधा.

– SIR फॉर्म भरून नाव, फोटो, पत्ता आणि इतर माहिती अद्ययावत करा.

– मतदार यादी शुद्ध व अचूक ठेवणे हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य आहे.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!