जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.
जळगाव रामेश्वर कॉलनी परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य स्मारक उभारणीच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलण्यात आले. जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोजभाऊ चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील नगरसेवक गणेश सोनवणे, इंजि. विजय मराठे यांनी संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहणी करून स्मारक उभारणीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

रामेश्वर कॉलनी परिसरातील शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेच्या पदाधिकाऱ्यानी जागेची पाहणी करून उपलब्ध जागा, तांत्रिक बाबी आणि पुढील प्रशासकीय प्रक्रियेबाबत अधिकान्यांसोबत चर्चा केली.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराजाचे शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत स्मारक उभारणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
या पाहणीमुळे रामेश्वर कॉलनी परिसरातील नागरिक आणि शिवप्रेमीमध्ये आनदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मारक उभारणीची प्रक्रिया लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

परिसरात उभारण्यात येणारे हे स्मारक इतिहासाची प्रेरणा जपणारे आणि युवकांमध्ये स्वाभिमान, राष्ट्रप्रेम व शौर्याची भावना जागृत करणारे एक महत्वाचे प्रेरणास्थळ ठरेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी दिपक मांडोळे, डि.र. पाटील, संजय सपकाळे, संजय जगताप, अरुण मालपाणी, संदिप मांडोळे, गणेश पाटील, चेतन शिंपी, राहुल कुलकर्णी, सागर पाटील ,चंद्रकांत पाटील, उमेश चौधरी, हेमंत पाटील इत्यादी परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते.
