श्रीरामपूर प्रतिनिधी, शरद खांदे.
श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवरील हॉटेल लक्ष्मीनारायणचे तरुण हॉटेल चालक-मालक श्री.आकाश शेखर दुबैय्या/ वेंकटरामन, यांचा त्यांच्या हॅाटेलमध्येच आरोपी सुरज जाधव व साथीदारांनी आज शनिवारी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास चाकूने भोकसून खून केला आहे.

आकाश दुबैय्या यांना साखर कामगार रुग्णालयात नेले असता प्रमुख वैद्यकीय अधिकारी श्री.डॅा.रवींद्र जगधने यांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान या हत्येचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. आरोपी सुरज जाधव हा नेवासारोडला बस स्टॅण्डसमोर चिकन टिक्क्याची गाडी चालवणारा असून तो शहरातील एका मोठ्या गुन्हेगाराशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे.
