चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

चोपडा शहरातील एका भाजप नगरसेवकाची सोशल मीडियावर कथित बदनामी करून आक्षेपार्ह मजकूर व छायाचित्रे प्रसारित केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार नरेंद्र साहेबराव पाटील (वय ३७), व्यवसाय – नगरसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ५ जुलै २०२६ रोजी सकाळी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपद्वारे एक पोस्ट प्राप्त झाली. संबंधित पोस्टमध्ये त्यांच्याबाबत व भारतीय जनता पक्षाबाबत आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर तसेच पक्षाचे अधिकृत चिन्ह वापरून दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी नईमुद्दीन एनोद्दिन शेख (रा. समता नगर, चोपडा) आणि सचिन जैस्वाल (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५६(२), ३५१(२), २५६(२)(४) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून बदनामी, धमकी तसेच शांतता भंग होईल अशा स्वरूपाचे संदेश प्रसारित केल्याच्या आरोपांची चौकशी सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.

(टीप : ही बातमी पोलीस नोंद व प्रथमदर्शनी फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून, संबंधित आरोप न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे बाकी आहे.)

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!