जळगाव (चोपडा) प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील (विशेष वृत्तांत)

मुक्ताईनगर : भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी तर्फे देशभर आयोजित करण्यात आलेल्या “स्मरण पंधरवाडा” उपक्रमांतर्गत भाजपा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र ची संघटनात्मक बैठक आज गोदावरी मंगल कार्यालय, मुक्ताईनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य स्तरावर पक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आगामी कार्यक्रमांची सविस्तर माहिती देत त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. तसेच संघटन अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक बाबी, पक्षाची विचारधारा, जनसंपर्क अभियान आणि बूथस्तरावरील संघटनात्मक कार्य अधिक सक्षम करण्याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, आघाडी व मोर्चांचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!