चोपडा प्रतिनिधी,  यज्ञेश्वर पाटील.

नाशिक : द टाइम्स ऑफ इंडिया समूहाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित “टाईम्स पॉवर वुमन” या विशेष सन्मान सोहळ्यास भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या.

महिलांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून त्यांना समाजासमोर प्रेरणादायी आदर्श म्हणून सन्मानित करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्योग, शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक, प्रशासकीय, उद्योजकता, कला, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला.

यावेळी श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित मान्यवर, पुरस्कारार्थी महिला आणि नागरिकांना संबोधित करताना महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. महिलांचे शिक्षण, स्वावलंबन, नेतृत्व क्षमता आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान हे भारताच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांचा सन्मान हा संपूर्ण समाजाचा गौरव असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सौ. देवयानी फरांदे, आमदार, सौ. हिमगौरी आहेर-आडके, नाशिकच्या महापौर, श्री संपत थेटे, महाराष्ट्र टाइम्स नाशिकचे संपादक, आणि श्री रूपेश शर्मा, टाइम्स ऑफ इंडिया नाशिकचे प्रमुख यांच्यासह कार्यक्रमास नाशिकमधील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!