प्रतिनिधी : यज्ञेश्वर पाटील, चोपडा

सार्वजनिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत चोपडा शहरात रविवार, दि. २८ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोहिमेचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. नम्रता सचिन पाटील आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या हस्ते बालकांना पोलिओची लस पाजून करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी पालकांना आपल्या प्रत्येक बालकाला वेळेत पोलिओचा डोस देण्याचे आवाहन केले. पोलिओसारख्या गंभीर आजारावर मात करण्यासाठी लसीकरण हाच सर्वात प्रभावी उपाय असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पोलिओ लसीकरण प्रक्रिया पार पाडत लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. शहरातील विविध पोलिओ लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती वाढण्यास मदत झाली असून, पोलिओमुक्त समाजाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!