प्रतिनिधी, शाकीर शेख, जळगाव.

राजे  संभाजी नाट्यगृह, जळगाव येथे ग.स. सोसायटीचे माजी अध्यक्ष, तसेच जळगाव महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आणि सहकार गटाचे प्रमुख श्री. उदय (बापू) पाटील यांच्या सेवापूर्तीप्रित्यर्थ भव्य सत्कार समारंभ उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सत्यजित दादा तांबे, आमदार राजू मामा भोळे, महापौर दीपमाला काळे, रोहित निकम, एस. एस. अण्णा पाटील, व्ही. झे. बापू पाटील, शिक्षक नेते एस. डी. भिरुड, संभाजी अप्पा पाटील, भाऊसाहेब आर. एच. बावीस्कर, प्रा. सुनील गरुड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच ग.स. सोसायटीचे आजी-माजी संचालक, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे विद्यमान संचालक मंडळ, जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक पतपेढी, भुसावळचे संचालक मंडळ, सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी श्री. उदय बापू पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करताना सभासद हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणे, संस्थेला कर्जमुक्त करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि महानगरपालिकेत विविध पदांवर कार्यरत असताना नागरी सुविधांच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या प्रामाणिक, लोकाभिमुख आणि कार्यक्षम सेवेमुळे त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या वतीने अध्यक्ष शैलेश राणे, उपाध्यक्ष तुषार बोरसे, सचिव डी. एस. पाटील, खजिनदार अजय पाटील, संचालिका वैशाली महाजन व सोनम पाटील तसेच संचालक जे. पी. सपकाळे, संदीप घुगे, जगदीश पाटील, सिधेश्वर वाघुळदे, भावेश अहिरराव, आबा पाटील, संजय सांगळकर, डिगंबर पाटील, हेमंत चौधरी, सचिन पाटील, संजय सोनवणे, भगतसिंग पाटील, संजय निकम, डी. ए. पाटील, मनोहर सूर्यवंशी, तज्ज्ञ संचालक आर. आर. धनगर, आर. एन. महाजन आणि सुनील महाजन यांनी श्री. उदय बापू पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या सेवापूर्ती समारंभातून श्री. उदय बापू पाटील यांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि समाजहिताच्या कार्याला उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक सलाम केला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!