चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

भारतीय जनता पार्टी, चोपडा तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या प्राकृतिक शेतीसंदर्भातील विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्राकृतिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात प्राकृतिक शेती कार्यशाळेचे संयोजक श्री. हिम्मतराव पुंडलिक पाटील (गरताड, ता. चोपडा) तसेच सहसंयोजक श्री. विजय बळीराम बाविस्कर यांनी प्राकृतिक शेतीची संकल्पना, शासनाच्या विविध योजना, त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या लोकाभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करून उत्पादन खर्च कमी करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.

यावेळी राज्य पणन महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय रोहितजी निकम यांचा उपस्थितांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

या कार्यक्रमास चोपडा ग्रामीण पश्चिम मंडलाध्यक्ष श्री. कांतीलाल पाटील, चोपडा ग्रामीण पूर्व मंडलाध्यक्ष श्री. पिंटूभाऊ पावरा, शहराध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील, सरचिटणीस युवराज आबा जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप पाटील, डॉ. विकी सनेर, मिलिंद पाटील, गौरव सोनार, दीपक भोसले, नंदूभाऊ धनगर, चंद्रशेखर पाटील, कांतीलाल पाटील (मजरे होळकर) यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमात प्राकृतिक शेतीचा प्रसार, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!