जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

घनसावंगी : शिरसवाडी शिवारातील गोदावरी पात्रामध्ये अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून वाहनात भरणे सुरू होते. दरम्यान, घनसावंगी पोलिसांनी गुरुवारी (ता. २५) पहाटे ५ हायवा टिपर पकडून कारवाई केली.

पोलिस निरीक्षक केतन राठोड यांना गुंज बुद्रुक, शिरसवाडी शिवारातील पात्रामध्ये काहीजण हायवा टिपरद्वारे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करीत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक केतन राठोड यांनी पथक तयार करून त्यांना शिरसवाडी शिवारातील गोदावरी नदीपात्रात पाठवले. त्यावेळी पथकाला नदी पात्रामध्ये काहीजण पाच हायवा टिपरमध्ये वाळूचे गोदावरी पात्रातून अवैधरीत्या उत्खनन करताना आढळून आले. पोलिसांनी वाहने जप्त करून चालकांना ताब्यात घेतले. यावेळी सुमारे २५ ब्रास वाळू असा एकूण एक कोटी एक्कावन्न लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाईसाठी ठाण्यात आणला. ही कारवाई सहायक पोलिस निरिक्षक अशोक खरात, कर्मचारी प्रकाश पवार, राधेशाम गुसिंगे, गंबर पोटे, कपिल अडियाल, सुरेश राठोड, नवनाथ राऊत, लोखंडे यांनी केली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!