जळगांव प्रतिनिधी, महेश माळी.

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०२६ रोजी यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालय २४, मेहरूण, जयभवानी नगर, तांबापुरा, जळगाव येथे साजरा करण्यात आला.

आज सकाळी 7.30 वाजता सौ. ज्योत्स्ना यशवंत बडगुजर आणि नीरजा अशोक शर्मा आणि शाळेतील विद्यार्थी, महिला आणि पुरूष शिक्षक तसेच इतर कर्मचारी यांच्या सहकाऱ्यांने ” जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन”, साजरा केला प्रोटोकॉल प्रमाणे सर्व सदस्यांनी प्रार्थना, आसन, प्राणायाम, ध्यान केले तसेच संकल्प, प्रार्थना आणि शांति पाठाणे कार्यक्रमाचा शेवट केला.

सूत्रसंचालन श्री.नंदकिशोर देवरे सरांनी केले, सत्कार आणि आभार सौ. राजश्री पगार मॅडमनी केले उपस्थित विद्यार्थी २०१, शिक्षक आणि शिक्षकेतर २५ होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!