जामनेर( विभागीय प्रतिनिधी महेशप्रसाद दिक्षित) :

लिटिल फ्लॉवर्स इंग्लिश मीडियम स्कूल, जामनेर येथे २१ जून रोजी जागतिक योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन तसेच विविध प्राणायाम प्रकारांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग विशेष उल्लेखनीय होता.

यावेळी योगशिक्षक म्हणून शाळेचे क्रीडाशिक्षक श्री योगेश धुंडाळे सर व श्रीमती सोनाली तिवारी यांनी जबाबदारी पार पाडली तर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रंजना आमोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “करो योग रा रहो निरोग चे महत्व पटवून देत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. योगामुळे शरीर निरोगी राहण्यास, मन एकाग्र होण्यास आणि जीवनशैली अधिक सकारात्मक बनण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी दररोज योगाचा सराव करून निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प केला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!