जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त हेल्थ अँड वेल्थ समितीच्या पुढाकारातून सहजयोग ध्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक आरोग्याचा विकास साधण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहजयोग ध्यानाचे महत्त्व, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच एकाग्रता, आत्मविश्वास व सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी ध्यानाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम युवाशक्ती संस्थेच्या ऐश्वर्या पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहज योग समिती, जळगावचे समन्वयक श्री. दीपक सुरेश संगीत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी हेल्थ अँड वेल्थ समितीच्या सदस्या श्रीमती उज्वला नन्नवरे यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ध्यानाचा अनुभव घेतला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळत असून मानसिक स्वास्थ्य, योग व सकारात्मक जीवनशैलीबाबत जनजागृती होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!