जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.
मेहरूण : जळगाव येथे आयोजित करण्यात येणाऱ्या हिरवा अंकुर पर्यावरण महोत्सवा संदर्भात चर्चा करण्यासाठी हिरवा अंकुर फाउंडेशनच्या नलिनी शहा मॅडम, निलय शहा सर तसेच ग्रीन फाउंडेशनचे विजय वाणी सर यांनी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे भेट दिली.
यावेळी विद्यालयाच्या इको क्लबतर्फे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हजारो वृक्षबियाण्यांचे पाकीट भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षलागवड, जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून दिले. हिरवा अंकुर पर्यावरण महोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक वृक्षलागवड व जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक मुकेश नाईक, पर्यवेक्षिका शीतल कोळी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
