चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

जळगाव विधानपरिषद मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा येथे महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री मा. श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीस भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. नंदकिशोर महाजन यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आणि महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांना अधिक बळ देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

बैठकीदरम्यान निवडणुकीच्या अनुषंगाने विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मतदानाचे नियोजन, संघटनात्मक बांधणी आणि मतदारांपर्यंत महायुतीच्या विकासकामांची माहिती पोहोचविण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विजयासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडले असून आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी चोपडा तालुक्यातील भाजपा-महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!