जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील.
जळगाव शहराचे लोकप्रिय, आदरणीय आमदार राजू मामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजीनगर मध्ये कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या, त्या अनुषंगाने आयोजक म्हणून माजी नगरसेवक राजेंद्र मराठे तसेच विजय तायडे आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धा संपन्न झाले. त्यावेळी त्या ठिकाणी प्रथम पारितोषिक ७१०० रक्कम माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्याकडून, दुसरे पारितोषिक ५१०० रक्कम कप माजी सेविका गायत्री उत्तम शिंदे यांच्याकडून, तिसरे पारितोषिक ३१०० रोख रक्कम माजी नगरसेवक अंकुश कोळी यांच्याकडून देण्यात आले.

तसेच इतर विशिष्ट खेळाडूंना इतर पारितोषिक अमोल सांगोरे, महेश चौधरी, आनंद सपकाळे इतर मान्यवरांकडून काही पारितोषिक देण्यात आले, बक्षीस समारंभाच्या वेळी उपस्थिती नगरसेवक नितीन भाऊ बर्डे, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, राजू मराठे, अंकुश कोळी, विजय बांदल, विजय जगताप, नरेंद्र शिंदे, आनंद महागडे इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे छत्रपती शिवाजीनगर कबड्डी मंडळातर्फे देणगीदार मान्यवरांचे आभार व्यक्त करण्यात आले.
