प्रतिनिधी, निलेश खैरनार. विशेष वृत्तांत
सरसकट कर्जमुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देत अडोळी (जि. वाशिम) येथील शेतकरी बांधवांनी शासनाच्या निषेधार्थ स्वतःची दुचाकी पेटवून तीव्र संताप व्यक्त केला.

ही केवळ दुचाकी जाळण्याची घटना नाही, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि शासनाच्या फसव्या आश्वासनांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मनातील आक्रोश आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सरसकट कर्जमुक्तीच्या लढ्याला दिवसेंदिवस जनसमर्थन वाढत असून आता शेतकरी थेट रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करू लागला आहे.
सरकारने वेळीच दखल घ्यावी… अन्यथा हा संताप महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही! असा इशारा देखील यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
