जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

मेहरूण : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली.

समितीच्या अध्यक्षपदी श्री. मुकेश नाईक यांची तर समिती प्रमुख म्हणून सौ. रूपाली आव्हाड मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक समितीचे मार्गदर्शक म्हणून कार्य पाहणार आहेत.

समितीमध्ये इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून समावेश करण्यात आला आहे. यामध्ये इयत्ता तिसरीची तृप्ती रोहित पाटील, इयत्ता चौथीची प्रांजल योगेश राठोड, इयत्ता पाचवीची स्वरा सुशील चव्हाण, इयत्ता सहावीची मानसी सतीश बोरसे, इयत्ता सातवीचा कन्हैया संदीप पाटील, इयत्ता आठवीची चैताली शरद इंदलकर, इयत्ता नववीची रोहिणी छगन पाटील तसेच इयत्ता दहावीची दुर्गा आधार पाटील यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली.

समितीमार्फत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी बचत व जलसंधारण, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती, स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम तसेच ऊर्जा बचत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरण संरक्षणाची चळवळ अधिक प्रभावी करण्याचा समितीचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. 🌱🌍

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!