जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.
शेतकऱ्यांना न्याय मिळावा, योग्य व तात्काळ विमा भरपाई मिळावी, तसेच वाढत्या नैसर्गिक संकटांपासून संरक्षण मिळावे यासाठी १५ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे श्री गजानन उगले आणि सहकारी यांच्या मार्फत बेमुदत आमरण उपोषण आयोजित करण्यात आले आहे.

कापूस, सोयाबीन, मका, तूर, हरभरा, गहू यांसारख्या पिकांवर सतत वाढणारे हवामान बदल, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ आणि इतर संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे २०२६-२७ विमा योजनेत प्रभावी ट्रिगर लागू करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी, ही मुख्य मागणी उपोषण आयोजक यांनी केली आहे,
