जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी बेमुदत आमरण उपोषण तीन दिवसापासून सुरू असून आजचा चौथा दिवस उपोषणाचा तिसरा दिवस असून अनेक तालुक्यातील शेतकरी भेटीसाठी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्त्याला पाठिंबा देत आहे व सरकारकडे विविध पद्धतीच्या घोषणा देऊन पिक विमा द्या ट्रिगर बदला व तसेच पाच लाख रुपये पर्यंत कर्जमाफी

द्या अशा विविध घोषणा शेतकरी बांधव देत आहेत तिसऱ्या दिवशी घनसांगी तालुक्यातील राणी उंचेगाव मंडळातील अनेक शेतकरी बांधव यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली व २० ते २५ गावाचा पाठिंबा जाहीर केला व गावांमध्ये आम्ही आता या विषयाबद्दल जनजागृती करू, अशा पद्धतीने आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविला.

या आंदोलनाची दखल प्रशासनाने न घेतल्यास आम्ही आमचे आंदोलन उग्र स्वरूपाचे करू. असा स्पष्ट इशारा प्रशासनाला यावेळी देण्यात आला. त्यावेळी विष्णू कोल्हे, राजेश मांगदरे, महादेव इंगळे, मधुकर पितळे, विठ्ठल हरबक, संजय ढेंबरे, विष्णू सावळे, परमेश्वर शिवतारे, विष्णू काळे व अन्य राणी उंचेगाव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!