जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे एका २५ वर्षीय तरुणीवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या भावाला अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा २०१६ पासून मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. धर्मांतरासाठी दबाव टाकत धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!