जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण

“एक विद्यार्थी – एक वृक्ष” संकल्पनेतून पर्यावरण जागर

मेहरुण – पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजात रुजवण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे इको क्लब तर्फे एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वृक्ष लागवडीसाठी बीज भेट देण्यात येत आहे.

या उपक्रमामागील उद्देश प्रत्येक कुटुंबाने किमान एक तरी वृक्ष लावावा व विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावे हा आहे. “एक विद्यार्थी – एक वृक्ष” या संकल्पनेतून शाळा पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचलत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी सांगितले की, सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे जतन करणे ही काळाची गरज आहे. लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अभिनव उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक होत असून, शाळेच्या या प्रयत्नामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचत आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!