जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात, जालना क्रिटिकल दवाखान्याजवळ असलेल्या हॉटेल व काही टपऱ्यांना आज रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत संबंधित हॉटेल व टपऱ्या जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले, तरी घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही; मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!