जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. (मेहरुण) –
आजच्या स्पर्धात्मक युगात पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य शाळेची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे पालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाद्वारे पालकांना शाळा निवडताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. शाळेच्या भौतिक सुविधा, परिसरातील शैक्षणिक वातावरण, अनुभवी शिक्षकवर्ग तसेच शाळेबद्दल स्थानिक नागरिकांच्या भावना या घटकांचा विचार करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

सध्या काही शाळांकडून प्रवेशासाठी घराघरांत जाऊन फक्त आश्वासने देण्याची प्रवृत्ती वाढत असून, अशा गोष्टींपासून सावध राहण्याची सूचना देखील पालकांना देण्यात आली आहे. फक्त जाहिरात किंवा आकर्षक बोलण्यावर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष शाळेची पाहणी करूनच निर्णय घ्यावा, असेही सांगण्यात आले.
या उपक्रमामुळे पालकांमध्ये जागरूकता वाढत असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत होत आहे.
