जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार.

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना पुर्णवादी नागरिक सहकारी बँकेची तब्बल ८ कोटी १२ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी बँकेचे शाखा अधिकारी आणि पंचमुखी वेअरहाऊसचे मालक यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअरहाऊसच्या नावावर बनावट खातेदार तयार करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केल्याचे उघड झाले आहे. याबाबत बँकेच्या करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या गंभीर आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल पांच्या आदेशानुसार तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या आधीच शाखा व्यवस्थापक शिरीष कमलाकर देवळे वय ५३) याला २१ एप्रिल रोजी अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. सर्व आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ३ समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन पुगे, पोलीस उपनिरीक्षक बन्सल, प्रभारी उपअधीक्षक सुरेश उनवणे शैलेश म्हस्के व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुंरगळ (पंचमुखी वेअरहाऊस मालक) व त्याचे सहकारी हे यापूर्वीच चंदनझिरा पोलीस ठाण्यातील जालना मर्चेंट बँक घोटाळा प्रकरणात अटकेत होते. त्यामुळे न्यायालयाकडून हस्तांतरण वॉरंट घेऊन त्यांना जालना जिल्हा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्येः रायचंद सखाराम कुंरगळ (मुख्य सूत्रधार) निलेश्वर शेषराव भोसले (भागीदार) रामेश्वर विलासराव जाधव (एजंट) ज्ञानेश्वर विलासराव जाधव (एजंट) गणेश रमेश साबळे (वेअरहाऊस मॅनेजर) यांचा समावेश आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!