जालना | स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे

जालना: महसूल विभागातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत सन २०२५-२६ या वर्षाचा जिल्हास्तरीय ‘आदर्श ग्राम महसूल अधिकारी’ पुरस्कार श्री. सिताराम मनसराम जारवाल यांना प्रदान करण्यात आला आहे. जालना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते त्यांना हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

लोकहितकारी कामाची पावती

श्री. सिताराम जारवाल हे घनसांगी तालुक्यातील सजा बोललापुरी येथे ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करत शासनाच्या विविध योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवल्या. गाव पातळीवर शासकीय योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

जालना येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते श्री. जारवाल यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. “एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे प्रशासनाची प्रतिमा जनमानसात उंचावते,” अशा शब्दांत यावेळी त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

वडी रामसगाव व तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव

सिताराम जारवाल यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल वडी रामसगाव, बोललापुरी सजा, मोहपुरी आणि संपूर्ण घनसांगी तालुक्यातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

विशेषतः वडी रामसगावचे ग्रामस्थ, बोललापुरी सजेतील नागरिक आणि त्यांचा मोठा मित्रपरिवार यांच्या माध्यमातून जारवाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!