धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे.

“गोदा ते नर्मदा” या भव्य जलयात्रेचे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी एसएसव्हीपीएस महाविद्यालय देवपूर, धुळे येथे माजी आमदार कुणाल पाटील व शहराचे आमदार अनुप अग्रवाल तसेच नगाव येथे आमदार राम भदाणे यांनी स्वागत केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित “गोदा ते नर्मदा” या भव्य जलयात्रेचे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी धुळे शहरात शिवाजी विद्याप्रसारक व नगाव येथील गंगामाई पॉलिटेक्निक येथे मंत्री मा. ना. श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब व मा. आ. श्री गोपीचंदजी पडळकर, आ. सदाभाऊ खोत, खा. रामराव वडकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात आगमन झाले.

धुळे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष तथा नंदुरबार भाजपा जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी व जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांनी स्वागत करून सत्कार केला. धुळे नगरीत व नगाव येथे या पावन जलयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्वागत यात्रेला प्रारंभ करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत आणि जयघोषात विविध ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन जलयात्रेला भव्य प्रतिसाद दिला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!