धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे.

गो सन्मान अभियान सबंध भारतभरातील संतांच्या वतीने भारत सरकारला गोमातेला सन्मान मिळावा, यासाठी २७ एप्रिल ही तारीख व सन्मान दिवस म्हणून पाळला जावा म्हणून सबंध भारतातील तहसील कार्यालयांमध्ये सर्व गोभक्त तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बजरंग दलचे कार्यकर्ते व विविध संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आली.

त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या शिंदखेडा तालुक्यात तालुक्याच्या वतीने सर्व गोभक्त व स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बजरंग दलाचे कार्यकर्ते किंवा अन्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व गोभक्त मिळून आपल्या शिंदखेडा येथील तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी आपल्या भागातील महंत योगी दत्ता नाथ महाराज प्रांत धर्म जागरण संस्कृती प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच दीपक जी सोनार तालुका शारीरिक प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच मनोज महाराज शिंपी विशाल महाराज बाविस्कर रोहन बाविस्कर प्रशांतजी कोळी पुष्कराज बोरसे व सर्व स्वयंसेवक तरुण बांधव मोठ्या संख्येने तहसीलदार कार्यालय शिंदखेडा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!