जिवा महाले नाभिक हितवर्धक संघातर्फे श्रीकृष्ण मंदिरात पूजन; समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती

अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील.

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. जिवा महाले नाभिक हितवर्धक संघ, अंतुर्ली यांच्या वतीने श्रीकृष्ण मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात समाजबांधवांनी संत सेना महाराजांना विनम्र अभिवादन केले.

संत सेना महाराज यांनी समाजाला दिलेला समता, सेवा आणि सदाचाराचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमास नाभिक समाजातील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात हा पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!