जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी.

जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणास तीव्र विरोध दर्शविणारे व संविधानात असलेली पुर्वीची एकत्रित आरक्षण व्यवस्था कायम ठेवण्यात यावी, यासाठी चर्मकार विकास संघातर्फे मान.मुख्यमंत्री/, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांना मान.निवासी उपजिल्हाधिकारी सौ.वैशाली चव्हाण यांचेमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. विश्वनाथ सावकारे, प्रदेश सदस्य श्री.संजय वानखेडे सर, प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतन तायडे, जिल्हाध्यक्ष डॉ.श्री.अर्जुन भारुळे, कार्याध्यक्ष ॲड.श्री.राजेश वाडेकर, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष श्री प्रकाश रोजतकर, शहर अध्यक्ष श्री.कमलाकर ठोसर, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.रतीराम सावकारे, श्री.संजय बाविस्कर सर, श्रीमती लता सावकारे, श्री.सुजल सावकारे, श्री.कैलास वाघ आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्व समाजबांधवांनी अनु.जाती. उपवर्गीकरणास आक्षेप नोंदविण्यासाठी आपला ईमेल: dg-sw@barti.in वर वैयत्तिक इ.मेल पाठवून आपला विरोध दर्शविण्याचे सूचित करण्यात आले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!