जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.

हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध : आता हे शक्य आहे. आता हे केलेच पाहिजे.या थीमसह जागतिक हिवताप दिवस साजरा…!!

चाळीसगाव :- दि.२५ एप्रिल २०२६ वार शनिवार रोजी महात्मा फुले आरोग्य संकुल ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव तसेच अनु.जाती नवबौद्ध मुलांची निवासी शाळा येथे जागतिक हिवताप दिवस निमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, डॉ.राजेंद्र चौधरी वैद्यकीय अधीक्षक वर्ग _1, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत पाटील यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी श्रेणी _1 डॉ.वैदेही पंडित, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंथन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.नांगरे, हिवताप पर्यवेक्षक किरण बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, हत्तीरोग इत्यादी कीटकजन्य आजाराविषयी अत्यंत सखोल मार्गदर्शन ग्रामीण रुग्णालय येथील अ.वै.सहा महेश सुर्यवंशी, आरोग्य सेवक दिपक ठाकरे, चंद्रकांत चौधरी, आयसीटीसी कौन्सेलर नामदेव अहिरे यांनी भागातील शाळा व दर्शनीय भागात भेट देऊन हिवताप जनजागृती केली, डास अळी विरोधी उपाय योजना, प्रतिबंध व निदान यावर प्राथमिक उपचार संबंधी सखोल आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच जलद ताप सर्वेक्षण करून ताप रुग्णाचे रक्तनमुने घेण्यात आले. प्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी वर्ग व कर्मचारी वृंद ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव.

विशेष सहकार्य

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद,अनु.जाती नवबौद्ध मुलांची निवासी शाळा येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचे लाभले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!