मराठवाडा प्रतिनिधी : अनिरुद्ध साबळे.
मुंबई : समाजकार्य आणि पोलीस – जनता यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘महापोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या मुंबई प्रदेश महासचिवपदी ॲड. राजगुरू बाळकृष्ण कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे सामाजिक आणि कायदेशीर वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निर्णय महापोलीस मित्र संघाच्या प्रणेत्या अनिताताई लष्करे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोक शंकरराव शेळके यांच्या विशेष प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे. संघटनेची व्याप्ती वाढवणे आणि मुंबईतील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी एका अभ्यासू नेतृत्वाची गरज ओळखून ॲड. कदम यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नियुक्ती मागील मुख्य उद्देश.
पोलीस-जनता समन्वय : पोलीस प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करणे.
कायदेशीर मार्गदर्शन : अन्यायग्रस्तांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणे.
सामाजिक सुरक्षा : मुंबई परिसरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे.
”ॲड . राजगुरू बाळकृष्ण कदम यांच्या नियुक्तीमुळे महापोलीस मित्र संघाला मुंबई प्रदेशात अधिक बळकटी मिळेल. त्यांच्या अनुभवाचा फायदा संघटनेच्या विस्तारासाठी आणि सामाजिक कार्यासाठी निश्चितपणे होईल,” असा विश्वास मुंबई प्रदेश अध्यक्ष अशोक शंकरराव शेळके यांनी व्यक्त केला.
ॲड. राजगुरू कदम यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
