जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख.
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली ते अंतुर्ली फाटयाच्या मधोमध चिंचोलचा नाला आहे, हा नाला अरुंद आहे. या नाल्याजवळ खूप छोटे मोठे अपघात झालेले आहेत, तरी या नाल्यावर संरक्षक भिंत किंवा संरक्षण जाळी सुद्धा नाही याकडे रस्ता विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतरण आहे, त्यात खाली दोन मोठे खड्डे पडलेले आहे. वाहन धारकाचा ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्याची रुंदी वाढवण्यात यावी व पुला जवळ संरक्षण भीत किंवा जाडी बसवावी, अशी वाहनधारक व नागरिकांकडून मागणी होत आहे. एकाच वेळेला दोन वाहने पास होताना वाहनधारकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे, अंतुर्ली कडे येणार हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याने शेतकऱ्यांची केळी ट्रक तसेच जड वाहने नेहमी वाहतात, या रस्त्याने नेहमी वाहनांची वर्दळ सुरू असते, ब्रेक बेरियर म्हणून फुलाच्या फळांवर स्टील किंवा कॉंक्रीट मजबूत अडथळे लावले जातात, जे अनियंत्रित वाहनांना पुलावरून खाली पडण्यास रोखतात.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत धोकादायक पूल आणि रस्त्याची दुरुस्ती व सुधारणा केली जाते पादचारी आणि दुचाकी स्वरांच्या सुरक्षतेसाठी पुलाच्या बाजूला संरक्षण लोखंडी जाळी लावली जाते, येथे असे काहीच नाही, म्हणून याकडे प्रशासनाने रस्ता विभागाने तात्काळ लक्ष देऊन संरक्षक भिंत जाळी बसवावी व त्याची रुंदी वाढवण्यात यावी या नाल्याजवळ अपघात होण्याची शक्यता आहे, म्हणून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
