धाराशिव जिल्हा विशेष प्रतिनिधी

आदरनिय संस्थापक अध्यक्षा अनिता लष्करे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महा पोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने बंदोबस्तासाठी दहा महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या महिला पदाधिकाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने व शिस्तबद्ध पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडत संपूर्ण कार्यक्रमाचा बंदोबस्त निर्विघ्नपणे पूर्ण केला. त्यांच्या सतर्कतेमुळे कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडला.

या उत्कृष्ट कार्याबद्दल महिला पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत असून, महा पोलीस मित्र संघाने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!