जळगाव, शाकीर शेख.

जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळच्या सुमारास काही नागरिकांना शिवारात संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

परिसराची पाहणी करून मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला असून, मृताचे नाव नरवेल येथील प्रमोद प्रल्हाद तायडे आहे व्यक्तीची ओळख दरम्यान, घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही व श्वान पथक दाखल झाले होते, त्यांनी पुरावे संकलित करण्यास सुरुवात केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, हा प्रकार घातपाताचा आहे की नैसर्गिक मृत्यू, याबाबत पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. अद्याप मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झालेला नाही.

या घटनेमुळे अंतुर्ली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.

