धुळे जिल्हा प्रतिनिधी :- प्रमोद बोरसे
नरडाणा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व भाजपाचे युवा नेते श्री. सत्यजित सिसोदे यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्या प्रसंगी पिंप्राडचे माजी सरपंच गिरीषभाऊ आखाडे, बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष श्री. पितांबर मंगळे, जयंती अध्यक्ष आदित्य मंगळे, भाजपाचे जेष्ठ नेते जिजाबराव सिसोदे, गणेश मोरे, जि. प. धुळेचे माजी उपअभियंता मधुकर सिसोदे,

तसेच विकास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अविनाश कोतकर, उर्दू विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर वाघ, तसेच विद्यालयातील शिक्षक श्री.संजीव जगताप, चेतन सिसोदे, राजेंद्र महाले, अनिल काळे, राजेंद्र सिसोदे, धवल पाटील, निखिल आखाडे, लिपिक योगेश ठाकरे, बौद्ध पंच मंडळाचे सदस्य विशाल मंगळे, दिपक मंगळे, आनंद मंगळे, लोटन मंगळे, यशवंत मंगळे, राहुल सपकाळ, विकी मंगळे, राजू मोरे, सागर पवार, सुनिल रणदिवे आदि कार्यकर्त्यांनी देखील अभिवादन केले.
