चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील.

सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरात इंधन टंचाईची चर्चा सुरू असताना चोपडा तालुक्यात मात्र नागरिकांसाठी दिलासादायक चित्र दिसत आहे. तालुक्यात गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासत नसल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे.

तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांना प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरची बुकिंग केल्यानंतर ३ ते ४ दिवसांत घरपोच सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

यासंदर्भात दिनांक 13/03/2026 रोजी गॅस एजन्सी व पेट्रोल पंप प्रतिनिधींची बैठक घेऊन पुरवठा व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व व्यवस्था काटेकोरपणे राबवली जात आहे.

तहसीलदार थोरात यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अनावश्यक गर्दी टाळावी. सर्वांना वेळेत आणि सुरळीत इंधन मिळणार असल्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. असे प्रशासनाने सांगितले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!