हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाचा संकल्प

जळगाव प्रतिनिधी : जाती-जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला संघटित करण्याच्या उद्देशाने जळगाव शहरात आज रविवार दि ५ एप्रिल २०२६ रोजी एका भव्य काशी विश्वनाथ हिंदू एकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज, नवनाथ नगर परिसरातील विविध सोसायट्यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून (जळगाव शहर कार्यवाहक रा. स्व. संघ) विजयजी धनराज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, ह.भ.प. श्री. लक्ष्मण महाराज खलाणे यांचे आशिर्वचन यावेळी लाभणार आहे. काशी विश्वनाथ बाबा महादेव मंदिर सिध्दीविनायक चौक, जळगाव. येथे हा मेळावा रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६:०० वाजता सूरू होईल. मेळाव्याचे आयोजन सकल हिंदू समाज, नवनाथ नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे. हिंदू समाजात सामाजिक समरसता आणि एकात्मता वाढवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, धर्म, संस्कृती आणि राष्ट्रहितासाठी एकत्र येऊया, आपली संस्कृती जपूया, समाजात एकता निर्माण करूया परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!