पाचोरा (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २ एप्रिल २०२६ रोजी शासकीय आयटीआयच्या प्रांगणात (STEP) शॉर्ट टर्म बॅचेससाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ व ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

प्रमुख कंपन्यांचा सहभाग

या रोजगार मेळाव्यात एकूण ५ नामांकित आस्थापना सहभागी झाल्या होत्या. यामध्ये:

* भारद्वाज नेटवर्क सोल्युशन प्रा.लि.पाचोरा: टेलिकॉम आणि इंटरनेट क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात आली.

* युवा शक्ती फाउंडेशन (नाशिक): हिताची (Astemo) आणि लिग्रँड या कंपन्यांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली.

* Quess (टाटा मोटर्स, पुणे): ‘शिका व कमवा’ योजनेअंतर्गत ८ उमेदवारांची ३ वर्षांच्या कालावधीसाठी निवड करून त्यांना जागीच ऑफर लेटर देण्यात आले.

* उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक: बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी मुलाखती घेतल्या.

* ह्यूमन डेव्हलपमेंट फाउंडेशन (पाचोरा): विविध उपक्रमांतर्गत करिअर संधींची माहिती दिली.

आकडेवारी आणि निवड प्रक्रिया

मेळाव्यासाठी एकूण ७७ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ६४ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. विविध कंपन्यांमार्फत एकूण १७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

याप्रसंगी उमेदवारांना मार्गदर्शन करताना दिनेश चौधरी (DSDA) यांनी जिल्हा नियोजन समिती (DPC) अंतर्गत लवकरच सुरू होणाऱ्या नवीन शॉर्ट टर्म कोर्सेसच्या बॅचेस आणि त्यातून मिळणाऱ्या संधींची माहिती दिली.

ह्यूमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे चेअरमन गोकुळ सोनार यांनी ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ (OJT) प्रोग्रामवर मार्गदर्शन केले. विशेषतः AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात रोजगाराच्या संधी कशा बदलत आहेत आणि त्यासाठी तरुणांनी तांत्रिकदृष्ट्या कशी तयारी केली पाहिजे, यावर त्यांनी सखोल प्रकाश टाकला.

उपस्थित मान्यवर

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आयटीआयचे प्राचार्य शिवकुमार जुमनाके,विजय बडगुजर सर, हेमंत पाटील सर, प्रशिक्षक पी.बी. पाटील सर, पी.पी. पगारे मॅडम, टी.पी. पाटील मॅडम, वाय.बी. पाटील सर, पूजा कोटूरवार मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!