जळगांव प्रतिनिधी :- जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे सामाजिक क्रांतीचे प्रणेते जगतगुरु संत रविदास यांच्या ६४९ व्या जयंती निमित्त श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी, नेरी नाक्याजवळ, जळगाव या ठिकाणी सकाळी ९ ते १ या वेळेत विविध सामाजिक उपक्रम समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सकाळी ९ वाजता रेल्वेस्टेशन जवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जगतगुरु संत रविदास यांच्या प्रतिमेस गटई कामगार श्री.मोहन डांबरे व गटशिक्षणाधिकारी श्री.विजय पवार, चर्मकार विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री.संजय वानखेडे सर, प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतन तायडे, जिल्हाध्यक्ष डॉ.श्री.अर्जुन भारुळे, महानगर अध्यक्ष श्री.कमलाकर ठोसर, श्री.गजानन दांडगेसर,सहसचिव श्री.शिवदास कळसकर, श्री.बाळकृष्ण खिरोळे, श्री. के.पी.भोळे, श्री.दीपक नेटके, श्री.इंद्रनील मोरे, श्री.सुजल सावकारे आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.

या वेळेस चर्मकार बंधूंनी बाईक वर पिवळे ध्वज व डोक्यावर केसरी टोपी परिधान करून संत रविदास यांच्या जय जय कारच्या घोषणा दिल्या त्यामध्ये “मन चंगा तो कठोती मे गंगा “जय जय गुरु रविदास, “ऐसा चाहू राज मै राज्य मे जहा मिले सबन को अन्न छोट बडो सब बैठे रविदास रहे प्रसन्न” अशा विविध प्रकारच्या गुरु रविदास यांच्या समतेच्या दोह्यांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. समता रॅली नेहरू चौक, शिवाजी चौक, स्वातंत्र्य चौक, काव्य रत्नावली चौक, डी.मार्ट, सिंधी कॉलनी, पंचमुखी हनुमान मंदिर, या मार्गाने मार्गक्रमण करीत श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी मधील संत रविदास महाराज समाज मंदिरात समारोप करण्यात आला.

या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी जळगाव विधानसभेचे आमदार श्री.राजुमामा भोळे, चर्मकार समाजाच्या नगर सेविका सौ.सुरेखाताई तायडे, चर्मकार विकास संघाचे पदाधिकारी श्री.विश्वनाथ सावकारे, श्री.संजय वानखेडे सर, ॲड.श्री.चेतन तायडे, डॉ.श्री.अर्जुन भारुळे, गटशिक्षणाधिकारी श्री.विजय पवार, श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष श्री.वसंतराव नेटके, सामाजिक कार्यकर्ते श्री.नितीनभाऊ तायडे, व्याख्याते श्री.सुरेश कुलकर्णी, श्री.कमलाकर ठोसर, श्री.बाळकृष्ण खिरोळे, श्री.गजानन दांडगे आदींच्या हस्ते जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी नुकतेच जळगाव म.न.पा.मध्ये प्रचंड प्रमाणात यश संपादन केल्याबद्दल आमदार श्री राजू मामा भोळे यांचा चर्मकार विकास संघ व श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी तर्फे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच चर्मकार समाजातून मनपा मध्ये नगरसेविका पदी प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल सौ.सुरेखाताई तायडे व श्री.नितीनभाऊ तायडे यांचा सत्कार शाल,पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

या प्रसंगी आमदार श्री.राजू मामा भोळे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित चर्मकार बंधू भगिनींना गुरु रविदास जयंतीच्या शुभेच्छा देऊन गुरु रविदास यांची शिकवण अंगिकारण्याचे व संघटित होऊन समाज विकास करण्याचे आवाहन केले तसेच संत रविदास चौक व श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटीच्या संत रविदास समाज मंदिर सभागृह अद्यावत करून देण्याचे आश्वासन दिले. नगरसेविका सौ.सुरेखाताई तायडे यांनी देखील समाजास सर्वोत्तपरि सहकार्य करण्याचे जाहीर केले.

या प्रसंगी व्याख्याते श्री.सुरेश कुलकर्णी सर यांनी गुरु रविदास यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेऊन त्यांच्या सामाजिक समतेचा, विज्ञानवादी दृष्टिकोनाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.संजय वानखेडे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.पुरुषोत्तम चिमणकर सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.वसंतराव नेटके, श्री.संजय वानखेडे, श्री.विश्वनाथ सावकारे, श्री.अर्जुन भारुळे, ॲड.श्री.चेतन तायडे, श्री.कमलाकर ठोसरे, श्री.दीपक नेटके, श्री.शिवदास कळसकर, सुजल सावकारे, लिलाधर काकडे, श्री.अमोल तायडे, श्री.विक्रम तायडे, प्रा. किसन भारुळे, श्री.गिरीश भोसले, श्री.मधुकर तांदळे, श्री.बाळकृष्ण खिरोळे, श्री.सुकदेव दांडगे, श्री.अविनाश वानखेडे, श्री.निलेश भारुळे, ज्ञानेश्वर देशमाने, श्री.रमेश भोळे, कडू भोळे, श्री.अशोक भारुळे, श्री.प्रभाकर धनगर, श्री.भिका भोई, श्री.केशव ठोसरे, श्री.पंढरीनाथ सावकारे, श्री.अशोक शिंदे, श्री. नरोत्तम परमार, श्री.दामोदर चव्हाण, श्री.आत्माराम चिमकर, श्री.इंद्रनील मोरे, श्री.मुरलीधर घुले, श्री.संजय चिमणकारे, श्री.विनय राखुंडे, श्री.पुरुषोत्तम चिमणकर, श्री. रिझायनर घुले, प्रा.श्री.दिलीप तायडे, श्री.चंद्रकांत घुले, सौ. आशा गव्हाळे, सौ.अरुणा परमार, सौ.अश्विनी कांबळे, श्रीमती सुमन रोजतकर, श्री.लिलाधर काकडे, सौ.रेखा सोनवणे, सौ.सुशीला तायडे, सौ.सुनीता डांगे, सौ.संगीता चिमकर, सौ. उषा दांडगे, सौ.रेखा उंबरे, श्रीमती लता सावकारे, सौ.राधा दांडगे, सौ.शुभांगी सावकारे, श्री.दीपक नेटके, श्री.नितीन तायडे, श्री. गोपाल घोलाणे, श्री. विलास काकडे, श्री.बाळकृष्ण खिरोळे, श्री.एकनाथ खिरोळे, श्री.राजू परिहार, सौरभ ताकवाले, श्री.हेमंत चव्हाण, श्री.शरद सावकारे, श्री.जितेंद्र भगीरथे, श्रीकांत साखरे, अनिल गव्हाडे, सौ. आशा गव्हाळे, श्री.सिद्धेश नेटके, आदींचे उत्तम सहकार्य लाभले.

या वेळेस जैन उद्योग समूहाच्या वतीने काव्यरत्ना वली चौकात संत रविदास यांच्या पोस्टरचे प्रदर्शन करून त्यांच्या दोह्यांचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल चर्मकार समाजातर्फे जैन उद्योग समूहाचे आभार व्यक्त करण्यात आले तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार व सोसायटीतील सभासद श्री. किशोर तायडे यांच्या अकाली निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित समाज बांधवांना अल्पोपार व चहापानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!