जळगाव प्रतिनिधी :-  जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाची सहविचार सभा आज सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाध्यक्ष ॲड.श्री.अर्जुन भारुळे यांच्या कार्यालयात समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाली. या प्रसंगी चर्मकार समाजात नवनिर्वाचित झालेले नगरसेवक व चर्मकार समाज भूषण तथा सुप्रसिद्ध उद्योजक श्री.अशोकजी खाडे यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. तसेच सर्व सामाजिक संघटनांची संयुक्त गुरु रविदास जयंती साजरी करण्याचे ठरविण्यात आले. या प्रसंगी बाईक रॅली, प्रतिमा पूजन, व्याख्यान, तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मान्यवर आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत करण्याचे ठरविण्यात आले.

या प्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विश्वनाथ सावकारे, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री संजय वानखेडे सर, प्रदेश सहसचिव ॲड.श्री.चेतन तायडे, जिल्हाध्यक्ष डॉ.अर्जुन भारुळे, सचिव प्रा.धनराज भारुळे, उपाध्यक्ष श्री गजानन दांडगे सर, महानगर अध्यक्ष श्री.कमलाकर ठोसर, तरसोद ग्रामपंचायत सरपंच श्री.संतोष सावकारे, श्री. ज्ञानदेव भारुळे, श्री.लिलाधर भारुळे, श्री.उमाकांत भारुळे सर, श्री.कैलास वाघ सर, श्री.सचिव श्री.शिवदास कळसकर, ॲड.मुकेश कुरिल, श्री.संदीप ठोसर सर, सुनीता डांगे, सौ.उषा दांडगे, सौ.सुशीला तायडे, सौ.रेखा सोनवणे, श्री.कमलेश वाडिया आदी उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!