भुसावळ प्रतिनिधी :-

आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोलिसांच्या सतर्कतेमुळे उपोषणकर्ते मिलिंद सोनवणे यांनी केलेल्या आत्मदहनाचा प्रयत्न थांबविण्यात यश आले.

भुसावळ नगर परिषद विरोधात दि  व 25 जानेवारी 2026 रोजी आणि ह्या पूर्वी दि 14 ऑगस्ट 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब जळगाव येथील जी. एस. ग्राउंड जळगाव येथे उपोषण करून सुद्धा त्यांच्या मागणीस योग्य न्याय न मिळालेने स्वराज्य पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे भुसावळ तालुका अध्यक्ष श्री. मिलिंद सोनवणे यांनी आज दि 26 जानेवारी 2026 रोजी भुसावळ नगर परिषद येथे प्रजासत्ताक दीना निमित्त झेंडा वंदन कार्यक्रम झाल्या नंतर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून घोषणा दिल्या, ह्या वेळी भुसावळ शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी यांनी ह्या वेळी सतर्कता दाखवून आत्मदहन करणाऱ्या मिलींद सोनवणे ह्यांना ताब्यात घेतले आहे.

भुसावळ नगर पालिका हद्दीतील सिंधी कॉलनी, नानक नगर नवजीवन सोसायटी ह्या परिसरातील बांधकाम परवानगी, कमरशीयल परवानगी तपासण्यात यावी, व नगर परिषदेने ह्या भागातील व्यापारी नागरिक यांच्या कडून आज रोजी अस्तित्वात असलेल्या इमला बांधिव क्षेत्रफळाचे मोजमाप करून योग्य प्रकारे कर वसुल करावा, आणि ह्या परिसरातील नाल्या ह्या नागरिकांनी अवैध रित्या बुजून टाकल्या आहेत त्या मोकळ्या करून सफाई करण्यात यावी अशा वाजवी मागण्या करिता एका नागरिकाला उपोषण करून न्याय मिळत नसेल व न्याय मिळवणे साठी आत्म दहन करावे लागत असेल तर स्थानिक नगर परिषद प्रशासन तथा मुख्याधिकारी काय कार्यवाही करणार ह्या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!