बारामती :- आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या घटनेत अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाचा ताबा सुटल्याने विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघाताचे फोटो समोर अंगावर काटा आणणारी आहेत. भीषण अपघातात विमान जळून खाक झाले आहे. या विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाल्याचा आणि आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळाताच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, खासदार सुप्रिया सुळे बारामतीकडे रवाना झाले आहेत.

अजित पवारांच्या विमानाचा नेमका अपघात कसा झाला?

महाराष्ट्र एका घटनेने आज हादरला आहे. विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांची अपघातात अशी अकाली एक्सिट मनाला चटका लावणारी आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यातच या दुःखद बातमीने महाराष्ट्र हादरला आहे.

अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. यानंतर काही सेकंदातच विमानाने पेट घेतला. संपूर्ण विमान या अपघातात जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरली होते. या घटनेची माहिती मिळातच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांच्यासह विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षा रक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे.

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पुत्र पार्थ पवार तसेच राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.अजित पवार हे 66 वर्षांचे होते. या अपघाताचे वृत्त समजताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सर्व राजकीय दौरे रद्द केले असून बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!