शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता
शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्यात संघभावना, नेतृत्वगुण, खिलाडूवृत्ती, आत्मविश्वास वाढावा या हेतूने शुक्रवार दिनांक ९ जानेवारी आणि शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन शालेय मैदानावर करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन जळगाव तालुका क्रीडा अधिकारी. डॉ. श्री.सुरेश थरकुडे साहेब तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष ॲड. श्री सुशील दादा अत्रे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजता होणार आहे. याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री अभिजित देशपांडे सहसचिवा सौ मीराताई गाडगीळ शाळेच्या समन्वयिका सौ. विजयालक्ष्मी परांजपे, मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या महोत्सवात खालील स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.
दिनांक ९/१/२०२५ शुक्रवार
सकाळी ६.५० ते १२
सकाळ विभाग
इयत्ता ५ वी – लंगडी स्पर्धा.
इयत्ता ७ वी – खो खो स्पर्धा.
मुलीसाठी – बॅडमिंटन स्पर्धा.
( ५ वी, ६ वी, ७ वी, स्वतंत्र गट )
दिनांक – १० /१/२०२५. शनिवार
सकाळी ६.५० ते १०
इयत्ता – ६ वी – कबड्डी.
मुलीसाठी – दोरी उड्या.
( एकच गट )
दुपार विभाग: शुक्रवार :वेळ दुपारी २ ते ५
शनिवार:वेळ सकाळी: ७ ते १०
इ.८वी :- क्रिकेट(मुलींसाठी), कबड्डी
इ.८वी :- मुलांसाठी
इ.९वी :- व्हॉलिबॉल(मुलांसाठी), बॅडमिंटन(मुलींसाठी)
क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख तथा उपमुख्याध्यापक श्री प्रशांत जगताप, पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे, सौ. रमा तारे, श्री.उल्हास ठाकरे, श्री.उमेष ढाकणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
