१२०० विद्यार्थांचा केला सन्मान

जळगांव :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्व. विद्यालयात किशोर महोत्सव – २५ चा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख अतिथी : महाराष्ट्रातील हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध हास्य कलाकार मा. प्रा.श्री. हेमंतदादा पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यासमितीचे प्रमुख प्रा. श्री. शरदचंद्र छापेकर सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. संजय वानखेडे, पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ. सुवर्णा वंजारी, उपप्रमुख सौ. स्मिता करे यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी यांचा सत्कार प्रा. श्री. शरदचंद्र छापेकर सर यांच्या हस्ते भेटवस्तू, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल देऊन करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर किशोर महोत्सव – २५ अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा :- चित्रकला, हस्ताक्षर, निबंध, प्रश्नमंजुषा, कथाकथन, वक्तृत्व, पॉवर पॉईंट स्लाइड शो, इंग्रजी व्याकरण मॉडेल, अवकाश, पृथ्वी, पर्यावरण, मॉडेल, तक्ता, हस्तकला, गणित, विज्ञान, पारंपरिक रांगोळी स्पर्धा, हस्तकला, हस्तलिखित, फलक लेखन, आनंद बाजार, विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, इ. स्पर्धांमधील १२०० बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व प्रशस्तिपत्र देऊन सन्माननीत करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथींनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं व शाळेचे अभिनंदन करून सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे तसेच विद्यार्थांनी मोबाईलपासून दूर राहून चांगली प्रेरणादायी पुस्तक वाचण्याचे व शाळेचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सौ.रेखा पाटील, सूत्रसंचालन सौ. मनिषा पवार यांनी तर बक्षीस वितरणाचे वाचन श्री. पंकज खंडाळे यांनी केले व आभार श्रीमती योगिता महाजन यांनी मानले. किशोर महोत्सव – २५ यशस्वी करण्यासाठी विविध समिती प्रमुख, उपप्रमुख, तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!