शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उसात उपोषण

घनसावंगी : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी गजानन उगले यांनी घनसावंगी येथील उसाच्या शेतात बुधवार (ता. ०७ जानेवारी २०२६) पासून उपोषण सुरू केले आहे. २०२४ मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान वाटप करण्यात आलेले नाही. तसेच २०२४ मधील रब्बी फळपीक विमा नियमानुसार वाटप करणे, २०२५ खरीप पीकविमा तत्काळ वाटप करणे, असे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागण्यांसाठी घनसावंगी येथील शेतकरी कैलास पवार यांच्या उसाच्या शेतात गजानन उगले यांनी उपोषणास प्रारंभ केला. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

आमरण उपोषणकर्त्यांना उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी तहसीलदार यांची भेट

आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी तहसीलदार यांनी भेट घेऊन सांगितले की ऊस प्रश्न बाबत सर्व कारखानदार व तुमचे शेतकरी प्रतिनिधी व आमचे प्रशासन यांची येत्या मंगळवारी sdm यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लाऊ व रब्बी 2024 फळ पिक विमा याबाबत देखील मंगळवारीच स्वतंत्र बैठक आयोजित करू, परंतु त्यावेळी उपोषणकर्ते यांनी तहसीलदार घनसांगवी यांना सांगितले की तुम्ही जोपर्यंत आम्हास आमच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!