जळगांव :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थित सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप जेष्ठ पर्यवेक्षक श्री.संजय वानखेडे पर्यवेक्षिका सौ रमा तारे, ज्येष्ठ शिक्षिका सौ पद्मजा जोशी, सौ. संगीता कुलकर्णी सौ रोहिणी प्रचंड, सौ रेवती किन्हीकर ज्येष्ठ शिक्षक श्री.आनंदा चौधरी, श्री. जगदीश साळुंखे श्री. सोमनाथ महाजन कार्यालयीन प्रमुख श्री. प्राजक्त प्रचंड, ग्रंथालय प्रमुख श्री. सुनील अंबिकार, यांनी घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेऊन ते अंगिकारण्याचे ठरविले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक श्री. प्रशांत जगताप, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री संजय वानखेडे पर्यवेक्षिका सौ. रमा तारे, श्री. जगदीश साळुंखे, श्री. ए. व्हि.चौधरी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
