जळगांव :- येथील चर्मकार विकास संघातर्फे भारतरत्न तथा घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी 257, भास्कर मार्केट, जळगाव या ठिकाणी चर्मकार बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीस ज्येष्ठ समाजबांधव श्री.काशीनाथ इंगळे, श्री. ज्ञानदेव भारुडे, श्री.प्रकाश रोजतकर, श्री. विश्वनाथ सावकारे, श्री. संजय वानखेडे सर, श्री. राजेश वाडेकर सर यांच्या हस्ते माल्ल्यारपण करण्यात आले. उपस्थित समाजबांधवांनी पुष्पांजली अर्पण करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळेस उपस्थित समाजबांधवांनी डॉ. बाबासाहेब यांच्या सामाजिक, शैक्षणिक व जीवनकार्याची माहिती सांगितली व त्यांच्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा मूलमंत्र अंगिकारण्याचे आवाहन केले.

या वेळेस श्री.लिलाधर भारुळे, श्री.मनोजकुमार सोनवणे, श्री.कैलास वाघ, श्री.रवींद्र नेटके, श्री.शिवदास कळसकर, श्री.रघुनाथ डोळे, श्री.यशवंत सावकारे, श्री.बाबू खाटिक, श्री.गुलाब पाटील, श्री.संतोष माळी आदी उपस्थित होते.हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.काशीनाथ इंगळे, श्री.संजय वानखेडे सर, श्री.विश्वनाथ सावकारे, श्री. गुलाब पाटील यांनी सहकार्य केले.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!